MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती

MJP Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील जलपुरवठा व मलनिस्सारण सेवा अधिक प्रभावीपणे विकसित व नियमन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत सन 2025 साठी मोठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र जलपुरवठा व मलनिस्सारण मंडळ (MWSSB) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेला सन 1997 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असे नाव देण्यात आले. राज्यभर जलसंपदा, पाणीपुरवठा व अभियांत्रिकी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे.

या भरती अंतर्गत लेखा, अभियांत्रिकी, लिपिक, लघुलेखक व तांत्रिक सहाय्यक अशा विविध संवर्गातील एकूण 290 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.


संस्थेचा तपशील

संस्था: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
भरती प्रकार: सरकारी भरती


पदांचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1लेखा परीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)02
2लेखा अधिकारी (गट-ब)03
3सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)06
4उपलेखापाल (गट-क)03
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)144
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)16
7उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)03
8निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)06
9कनिष्ठ लिपिक / लिपिक-नि-टंकलेखक (गट-क)46
10सहाय्यक भांडारपाल (गट-क)13
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)48
एकूण290 पदे

शैक्षणिक पात्रता (पदानुसार)

पद क्र.1:
B.Com किंवा समतुल्य + किमान 10 वर्षांचा अनुभव

पद क्र.2:
M.Com किंवा समतुल्य + किमान 05 वर्षांचा अनुभव

पद क्र.3:
B.Com

पद क्र.4:
B.Com

पद क्र.5:
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी

पद क्र.6:
मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा

पद क्र.7:
10वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट + इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.

पद क्र.8:
10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट + इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.

पद क्र.9:
पदवीधर + इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.

पद क्र.10:
10वी उत्तीर्ण + इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा मराठी 30 श.प्र.मि.

पद क्र.11:
10वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी


वयोमर्यादा (01 नोव्हेंबर 2025 रोजी)

  • पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2 ते 11: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग: ₹900/-

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज व शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख19 डिसेंबर 2025 ते 26 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स

शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top