पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत पदे रिक्त; येथे बघा संपूर्ण माहिती!! !| WSSO Maharashtra Recruitment 2026

WSSO Maharashtra Recruitment 2026 : अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये विविध तांत्रिक, अभियांत्रिकी व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 22 रिक्त पदे करार तत्वावर भरण्यात येणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज निर्धारित नमुन्यात ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे सादर करणे आवश्यक आहे. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी जाहिरातीनुसार लागू राहतील. अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असून अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 असून त्यानंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भरतीचा संक्षिप्त तपशील

• पदांचे नाव: प्रकल्प व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, उप व्यवस्थापक (IMIS), भूजल तज्ञ, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उप अभियंता, शाखा अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपीक, शिपाई
• एकूण जागा: 22
• नोकरी ठिकाण: मुंबई
• अर्ज पद्धत: ऑफलाईन / ई-मेल
• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मार्च 2026

पदनिहाय जागा

• प्रकल्प व्यवस्थापक (जल जीवन मिशन) – 01
• प्रकल्प व्यवस्थापक (स्वच्छ भारत मिशन) – 01
• उप व्यवस्थापक (IEC) – 01
• उप व्यवस्थापक (HRD) – 01
• उप व्यवस्थापक (पाणी व गुणवत्ता) – 01
• उप व्यवस्थापक (IMIS) – 01
• भूजल तज्ञ – 01
• स्वच्छता व आरोग्य सल्लागार – 01
• उप अभियंता – 01
• शाखा अभियंता – 06
• उपलेखापाल – 01
• सहाय्यक – 03
• लिपीक – 01
• शिपाई – 02

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे (अभियांत्रिकी, व्यवस्थापन, लेखा, प्रशासन इ.). पदनिहाय सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

• कमाल वय: 65 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राज्य पाणी व स्वच्छता मिशन
पहिला मजला, सिडको भवन,
बेलापूर, नवी मुंबई – 400614

महत्त्वाची तारीख

• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मार्च 2026

Important Links For wsso.in Bharti 2026
📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.wsso.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top